
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य फ्लोअर-बॉल असोसिएशन व जळगाव जिल्हा फ्लोअर-बॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे रोझलँड इंग्लिश स्कूल येथे अंडर १४ व अंडर १९, पुरुष/महिला गटाची ११वी राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी स्प्ननील गुडेकर यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच स्वप्नील गुडेकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी या अगोदर अनेक राज्य स्पर्धेमध्ये आपली उत्तम पंच म्हणून कामगिरी निभावली आहे. या निवडीबद्दल राज्य संघटनेचे सचिव रवींद्र चोथवे, डॉ उदय डोंगरे, बाजीराव भुतेकर, संतोष अवचार, तेजस बोरकर, विशाल जाधव, हार्दिक नवघरे, मनोज जाधव, निखिल शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.