
छत्रपती संभाजीनगर ः संगमनेर येथे होणाऱ्या सहाव्या सब ज्युनिअर, ज्युनिअर राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सहाव्या सब ज्युनियर, ज्युनिअर जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेतून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ घोषित करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात आर्यन थोरात, उत्कर्ष बसेर, हर्ष मैड, साकिब शेख, सोहम बनसोडे, दक्ष जाधव, आनंद देवरे, पार्थ कावरे, नागराज शिंदे, सुशांत कांबळे, शर्वरी चव्हाण, किमया जोशी, शुभ्रा कुलकर्णी, ह्रत्वी वाठोरे, वेदाली धोत्रे, प्रियम महाला, माही बेंद्रे, स्नेहल मुंडे, अपेक्षा अवचरमल, वैष्णवी शर्मा, शौर्या जांभळे, आर्या जांभळे, तनुजा देवरे, अपेक्षा अवचरमल.
या संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून रीना खुपसे तर संघ व्यवस्थापक म्हणून सुरज बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गजानन सानप, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, सचिव सुरेश मिरकर, तांत्रिक अधिकारी छाया मिरकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.