
वेदांत काळेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
छत्रपती संभाजीनगर ः पीएसबीए इंग्लिश स्कूल वेदांत काळे आणि सत्यजित कामठे या खेळाडूंनी हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर तलवारबाजी स्पर्धेत शानदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेमध्ये सेबर प्रकारात चमकदार कामगिरी करत उत्कृष्ट प्रदर्शन केले. वेदांत काळे व सत्यजित कामठे या विद्यार्थ्यांनी सांघिक सुवर्णपदक पटकाविले. तसेच वेदांत काळे यांनी वैयक्तिक प्रकारात देखील सुवर्णपदक पटकाविले. वेदांत काळे याने सुवर्णपदक प्राप्त केल्यामुळे त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली आहे.
वेदांत आणि सत्यजित यांच्या घवघवीत यशाबद्दल व पुढील स्पर्धेकरिता संस्थेच्या अध्यक्ष डॉ संजीवनी भोसेकर, उपाध्यक्ष अशोक भोसेकर, प्रशासिका समृद्धी भोसेकर, मुख्याध्यापिका पद्मा जावळेकर व उपमुख्याध्यापिका अर्चना कुरुंदकर व सेव्हरिन लुईस, प्राथमिक विभाग प्रमुख अपर्णा पिंपळे व सर्व शिक्षिका यांनी त्याचे अभिनंदन केले आहे व आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना अभिजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.