
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात उपक्रम उत्साहात
छत्रपती संभाजीनगर ः १५ ऑगस्ट २०२५ रोजी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर भव्य उपक्रम राबविण्यात आला. पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव तसेच राज्यातील अनेक शहरांमध्ये एकाच वेळी ७९ मिनिटे न थांबता स्केटिंग करून ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरातील विभागीय क्रीडा संकुल येथे अंबे स्केटिंग अकॅडमीचे संस्थापक भिकन अंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पूर्ण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमृत बिऱ्हाडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून उत्साह वाढवला. रेकॉर्ड दरम्यान प्रमुख ऑफिशियल म्हणून राधिका अंबे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
संपूर्ण रेकॉर्ड यशस्वी करण्यासाठी गणेश बनसोडे, साई अंबे, प्रवीण जैस्वाल, गणेश जाधव आदी प्रयत्नशील होते. ४ ते २० वर्षे वयोगटातील स्केटर्सनी या विक्रमी उपक्रमात सहभाग घेतला. पालकांनी हजेरी लावून स्केटर्सना प्रोत्साहन दिले. संपूर्ण वातावरण देशभक्तीपर गीतांनी भारावून गेले होते.

हा विक्रम एकाच वेळी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये राबविण्यात आल्याने हा उपक्रम ऐतिहासिक ठरला. हा विक्रम ३ प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, जीनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि यू एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांचा समावेश आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक स्केटिंग खेळाडूला ३ वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट्स व मेडल मिळणार आहेत. यात अंबे स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी देखील चमकदार कौशल्य सादर केले. त्यात शौर्य संदीप पाटील, केतन योगेश हापट, नमन लक्ष्मण शिंदे, अंश रवींद्र गाढे, विवान निकलेश काला, शेख अरमान अहमद, अश्मित मंगेश काकडे, अन्वी मंगेश काकडे, तक्षील सचिन चक्रे, त्रिजल सचिन चक्रे, भार्गव गजानन निकम, श्रेया अभय म्हसके, श्रेयश अभय म्हस्के, समर्थ दीपक इंगळे, दिव्या सुधीर हंकर, ध्रुव प्रवीण जैस्वाल, तेजस मधुकर सोनाळकर, अगम्य लोकेश रगडे, गौरी गणेश जाधव, अर्णव हेमंत लंके, ईशिका सिद्धार्थ साबळे, रिया शीतल पाटनी, तेजल बळीराम बोंबले, अन्वित प्रवीण महाजन आणि साई भिकन अंबे यांचा समावेश आहे.
या विक्रमी कामगिरीमुळे छत्रपती संभाजीनगरचे स्केटर्स आता अधिकृत वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्केटर्स बनले असून महाराष्ट्राने संपूर्ण देशाच्या नकाशावर नवा इतिहास रचला आहे.