
मुंबई ः आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे झालेल्या १५ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कोमल पाल हिने सांघिक कांस्यपदक जिंकले.
काकीनाडा येथे १ ते १२ ऑगस्ट या कालावधीत ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा झाली. या स्पर्धेत साई सेंटरची हॉकी खेळाडू कोमल पाल हिने उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना शानदार खेळ केला. कोमल पाल हिने कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी कोमल पाल हिचे अभिनंदन केले आहे.