
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटना च्या वतीने “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत १५ ऑगस्ट रोजी सर्व शहीद जवानांना सायकल रॅलीच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.
या रॅलीस सेवन हिल येथील सायकल बेट येथून सुरुवात झाली. सायकल रॅलीचे हे अकरावे वर्ष होते. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात सायकलिस्टस उपस्थित झाले. त्याबद्दल दौलताबाद किल्ल्याचे व्यवस्थापक संजय रोहनकर यांनी विशेष आभार व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर शहरापासून पावसाने हजेरी लावली. “भारत माता की जय” ,”जय जवान जय किसान” ,”वंदे मातरम”, “मेरा देश मेरा अभिमान” ,”शहीद जवान अमर रहे”, या जयघोषात रॅली मोठ्या उत्साहात , अतिशय शिस्तबद्ध अशी छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या रॅलीमध्ये ५० सायकलपटू सहभागी झाले होते.
या सायकल रॅलीमध्ये संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, राजकुमार मालानी, अमोघ जैन, डॉ दीपक कुंकूलोळ, अभिजीत कुलकर्णी, सोनम शर्मा, मनीष खंडेलवाल, डॉ संगीता देशपांडे, अजय पांडे, संतोष हिरेमठ, श्रद्धा कचेश्वर, अर्णिका कचेश्वर, कृतिका कचेश्वर, साई जोशी, यशोधन गाडेकर, रवींद्र जोशी, आबासाहेब मोराळे, आरती आबासाहेब मोराळे, हरिश्चंद्र मात्रे, अविनाश नागरारे, चंद्रकांत कदम, रामेश्वर भोपळे, प्रसाद जोशी, विशाल आढावे, कार्तिक आढावे, तेजल आढावे, ध्येयश झिरपे, शिवाजी झिरापे, महादेव ठोंबरे, कृष्णा ठोंबरे, संतोष मुळे, आशिष कळंब, जनार्दन चोपडे, दत्तात्रय तोडकर, राहुल गोकलांनी, सचिन कासलीवाल, कविता जाधव, राजेंद्र ससाणे, कृष्णा पांढरे, संजय महाजन यांनी सहभाग नोंदविला.