
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा पुरस्कृत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी ट्रॉफी १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू मानस हाथी याने (५ गुण) निर्णायक पाचव्या साखळी फेरीत संयुक्त आघाडीवरील फिडे गुणांकित श्लोक पवार याला (४ गुण) पराभूत करत गटविजेतेपद पटकाविले.
प्रथम मानांकित मानस हाथीने आक्रमक चाली रचत चतुर्थ मानांकित श्लोक पवारच्या राजाला २७ व्या मिनिटाला शह दिला आणि प्रथम क्रमांकावर झेप घेतली. श्लोकला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. फिडे इंस्ट्रक्टर राजाबाबू गजेंगी व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्याने आयोजित बँक ऑफ बडोदा चषक १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत नंद पाठक याने (४ गुण) तृतीय, हुसैना राजने (४ गुण) चौथा, मैत्रेयी बेराने (४ गुण) पाचवा, अनय भांगरेने (४ गुण) सहावा क्रमांक मिळविला.
७ वर्षांखालील गटात लिया कृष्णनने (४.५ गुण) प्रथम, निर्वाण दर्यानानीने (४ गुण) द्वितीय, चैतन्या नगराळेने (३.५ गुण) तृतीय, रियान गालाने (३.५ गुण) चौथा, अनिश अगरवालने (३.५ गुण) पाचवा, संचित काळेने (३ गुण) सहावा क्रमांक मिळवला.
१० वर्षांखालील गटात अहान कातारुकाने (५ गुण) प्रथम, नित्या बंगने (४ गुण) द्वितीय, आराध्य पुरोने (४ गुण) तृतीय. शिवांश गिरीने (४ गुण) चौथा, आदित गोखलेने (४ गुण) पाचवा, लक्ष परमारने (३.५ गुण) सहावा क्रमांक मिळवला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचे स्पर्धेला मार्गदर्शन लाभले. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटूसह १६२ खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या स्पर्धेत ९० पुरस्कार देण्यात आले.