
निफाड नगरपंचायत व निफाड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
निफाड (विलास गायकवाड) ः निफाड पोलीस स्टेशन तसेच निफाड नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती मॅरेथॉन रॅलीचे भव्य आयोजन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन स्पर्धेचे निफाड गावात आयोजन करण्यात आले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेप्रसंगी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रभारी नगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, पोलीस अधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, मुख्याधिकारी धीरज भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शांतीनगर चौफुली येथून या मॅरेथॉन स्पर्धेला प्रमुख मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. उगाव रोड ते शिवडी गेट यादरम्यान स्पर्धा पार पडली.यामधून एक ते पाच असे क्रमांक काढून विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निफाड पोलीस स्टेशन व निफाड नगरपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी निफाड नगरपंचायतचे नगरसेवक नगरसेविका तसेच निफाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी पदाधिकारी विविध शाळेतून आलेले क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले, या स्पर्धेसाठी क्रीडा सह्याद्री ,क्रीडा प्रबोधिनी वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल, वैनतेय विद्यालय निफाड, निफाड इंग्लिश स्कूल निफाड, स्वामी विवेकानंद कुंदेवाडी, के के वाघ भाऊसाहेब नगर, विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल निफाड, वैनतेय ज्युनिअर कॉलेज निफाड, के के वाघ जुनिअर कॉलेज, चांदोरी, विविध शाळेने सहभाग नोंदवला.