
मुंबई ः ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ मुंबई उपनगर जिल्ह्यात संपन्न होत आहे. त्यामध्ये १७ ऑगस्ट रोजी पावनखिंड दौडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धेमध्ये मुंबई महापालिकेच्या १५ वर्षांखालील जवळ जवळ दीड हजार मुलांनी सहभाग घेतला होता.
चेंबूर नाका शाळा संकुलातील ८० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व मुलांनी पावनखिंड दौड यशस्वी केली. सर्व खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. क्रीडा संघटक डॉ जितेंद्र लिंबकर, पद्मिनी नारकर, केशव बोरकर, डॉ भारती ढोकरट, स्मिता पोतदार, भाऊराव जमरे, सुवर्णा खुडे, रमेश बोडके, मिलिंद संदनशिव, संदेश जुईकर, बजागे सर, संजय कांबळे, प्रफुल चाबरे यांचे सहकार्य लाभले. तसेच स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेतर्फे कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर तसेच या स्पर्धेचे समन्वयक रामेश्वर लोहे, राम ओवाळ, सतीश कदम पाटील, अतुल ठाकूर यांनी स्पर्धेसाठी विशेष सहकार्य घेतले.