
महाराष्ट्राने पटकावली ११ पदके
छत्रपती संभाजीनगर ः देहरादून (उत्तराखंड) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय अॅक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये के आर एस स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू सौम्या सुनील म्हस्के, सलोनी सुनील म्हस्के, प्रिया आनंदा आगीवाले, शुभम सुनील सरकटे व रिद्धी सचिन जैस्वाल यांनी सुवर्ण पदक पटकावले. तसेच साहिल दीपक माळी, हर्षल राहुल आठवले यांनी रौप्य पदकाची कमाई केली.
मागील ४ वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत केआरएस अकॅडमीच्या खेळाडूंनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि महाराष्ट्राला अनेक पदक मिळवून दिली आहेत. या स्पर्धेत एकूण ७ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी ११ पदके के आर एस स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी जिंकली आहेत. महाराष्ट्र संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, पंच, अकादमीच्या कोषाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्योती शिंदे (मोरे) यांची निवड करण्यात आली होती. तसेच जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पंच प्रा प्रवीण रावण शिंदे यांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत घवघवीत यश मिळवणारे खेळाडू व प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष डॉ आदित्य जोशी, सचिव डॉ मकरंद जोशी, डॉ सागर कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष अॅड संकर्षण जोशी, उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, सचिव हर्षल मोगरे, डॉ विशाल देशपांडे आणि के आर एस स्पोर्ट्स अकादमी अँड जिम्नॅटिक्स केंद्राचे अध्यक्ष रावण शिंदे, उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अरविंद शिंदे, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांंनी अभिनंदन केले आहे.