संभाजीनगर येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार गौरव

  • By admin
  • August 18, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा उपक्रम

छत्रपती संभाजीनगर ः हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा-भारती आणि जिल्हा ऑलिम्पिक संघटना २०२४-२५ या वर्षात आपल्या ऐतिहासिक शहराचे नाव यशोशिखरावर नेणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करणार आहे.

या सोहळ्यात सत्कारासाठी २०२४–२५ यादरम्यानच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी https://forms.gle/oYrcRosvzpAezqJz7 या लिंक वर तसेच आप-आपल्या खेळाचे संघटना सचिव यांच्याकडे प्रमाणपत्राच्या झेरॉक्स जमा करणे बंधनकारक आहे. पात्र खेळाडूंची यादी सचिवांनी २४ ऑगस्टपर्यंत ऑलम्पिक संघटनेचे सचिव ॲड गोविंद शर्मा (९४२२२९४१७६) किंवा सहसचिव डॉ दिनेश वंजारे (९३२६२०३७४१) यांच्याकडे जमा करावी. विविध खेळांच्या सचिवांकडून प्राप्त झालेल्या यादी मधील खेळाडूंचाच सत्कार या सोहळ्यात होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

या सत्कार सोहळ्यात २०२४-२५ सालात जिल्ह्यातील जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नाव नोंदवावीत असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटना व क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष सौरभ भोगले, डॉ उदय डोंगरे, अजिंक्य सावे, डॉ मकरंद जोशी, हर्षवर्धन कराड, मनीष धूत, विनोद नरवडे, कुलजीत सिंग दरोगा, डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ प्रदीप खांड्रे, निलेश मित्तल, डॉ दयानंद कांबळे, डॉ संदीप जगताप, नीरज बोरसे, राकेश खैरनार, भिकन अंबे, सुरेश मिरकर, महेश इंदापुरे, अब्दुल कदीर, विनायक राऊत, मोहम्मद रियास, लता कलवार, अमृत बिऱहाडे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *