
२८ ऑगस्टपासून सहा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस
मुंबई ः भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा नवीन हंगाम दुलीप ट्रॉफीने सुरू होईल आणि ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होईल. गेल्या हंगामात दुलीप ट्रॉफी राउंड-रॉबिन पद्धतीने खेळली जात होती. आता स्पर्धेचे झोनल फॉरमॅट परत आल्यामुळे, नॉकआउट स्टेज परत येईल.
दुलीप ट्रॉफी २०२५ मध्ये एकूण ६ संघ सहभागी होतील. यामध्ये मध्य विभाग, पूर्व विभाग, उत्तर पूर्व विभाग, उत्तर विभाग, दक्षिण विभाग आणि पश्चिम विभागातील संघांचा समावेश आहे. गेल्या विभागीय हंगामाचा (२०२३) अंतिम सामना दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यात खेळला गेला होता. या कारणास्तव, हे दोन्ही संघ थेट उपांत्य फेरीत खेळतील. उर्वरित चार संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळतील. पराभूत संघ बाहेर पडतील आणि विजयी संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
शुभमन गिल हा नॉर्थ झोनचा कर्णधार आहे. दुलीप ट्रॉफी २०२५ चे सर्व सामने बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवले जातील आणि इंग्लंड दौऱ्यात सहभागी झालेले यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल हे खेळाडू देखील या स्पर्धेत भाग घेतील. याशिवाय, कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणारे श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी देखील आपला लौकिक दाखवताना दिसतील.
पूर्व विभाग : अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), आशीर्वाद स्वेन (यष्टीरक्षक), संदीप पटनायक, विराट सिंग, दानिश दास, श्रीदाम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र, रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनिषी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, मुख्तार हुसैन आणि मोहम्मद शमी.
स्टँडबाय: वैभव सूर्यवंशी, स्वस्तिक सामल, सुदीप कुमार घरमी आणि राहुल सिंग.
दक्षिण विभाग ः तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीशन, त्रिपुराण विजय, आर साई किशोर, तनय त्यागराजन, विजयकुमार वैष्णव, निधिश सिंग भुजा, निधी सिंग भुजा, एनएमडी भुजा, एन कौठणकर.
स्टँडबाय: मोहित रेडकर, आर स्मरण, अंकित शर्मा, एडन ऍपल टॉम, आंद्रे
पश्चिम विभाग : शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सर्फराज खान, रुतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्रसिंग जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.
स्टँडबाय: महेश पिठिया, शिवालिक शमा, मुकेश चौधरी, सिद्धार्थ देसाई, चिंतन गजा, उर्विल पटेल, मुशीर खान.
उत्तर विभाग : शुभमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बडोनी, यश धुल्ल, अंकित कलसी, निशांत संधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युद्धवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, आकीब नबी, कानबीन.
स्टँडबाय : शुभम अरोरा (यष्टीरक्षक), जसकरणवीर सिंग पॉल, रवी चौहान, आबिद मुश्ताक, निशंक बिर्ला, उमर नझीर, दिवेश शर्मा.
मध्य विभाग ः ध्रुव जुरेल (कर्णधार/विकेटकीपर), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, दानिश मलेवार, संजीत देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चहर, सरांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठौर, हर्ष दुबे, मानवेल अहमद, खलहर सुत.
स्टँडबाय : माधव कौशिक, यश ठाकूर, युवराज चौधरी, महिपाल लोमरोर, कुलदीप सेन, उपेंद्र यादव)
ईशान्य विभाग ः जोनाथन रोंगसेन (कर्णधार), आकाश कुमार चौधरी, तेची डोरिया, युमनुम कर्नजीत, सेदेझाली रुपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवरा, फिरोझम जोतिन सिंग, पलजोर तमांग, अंकुरजीत मलिक, बोथराह मलिक, अरविजता मलिक, बी. अजय सिंग.
स्टँडबाय : कांशा यांगफो, राजकुमार रेक्स सिंग, बॉबी झोथनसांगा, दिपू संगमा, पुखरुम्बम प्रफुल्लमणी सिंग, ली योंग लेपचा, इमलीवाती लेमतूर.
दुलीप ट्रॉफी वेळापत्रक
क्वार्टरफायनल १ : २८-३१ ऑगस्ट: नॉर्थ झोन विरुद्ध ईस्ट झोन
क्वार्टरफायनल २ : २८-३१ ऑगस्ट: सेंट्रल झोन विरुद्ध ईशान्य झोन
सेमीफायनल १ : ४-७ सप्टेंबर: साउथ झोन विरुद्ध विजेता क्वार्टरफायनल-१
सेमीफायनल २ : ४-७ सप्टेंबर: वेस्ट झोन विरुद्ध विजेता क्वार्टरफायनल-२
अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.
दुलीप ट्रॉफी – सर्व संघांचे पथक