
मुंबई ः आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बँक ऑफ बडोदा पुरस्कृत स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओबी ट्रॉफी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ८ वर्षांखालील गटात झियान नागरेचाने, ११ वर्षांखालील गटात शिवांश गिरीने आणि १४ वर्षांखालील गटात अथर्व देशमुख यांनी सर्वाधिक ४.५ गुण घेत गट विजेतेपद पटकाविले.
फिडे गुणांकन प्राप्त शिवांश गिरीने प्रथम स्थानावर झेप घेताना निर्णायक पाचव्या फेरीपर्यंत आघाडीवर राहिलेल्या फिडे गुणांकित धैर्य बिजलवानचा (४ गुण) २८ व्या मिनिटाला पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अॅड प्रकाश लब्धे, अॅड प्रेमानंद भोसले, डॉ सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. विविध जिल्ह्यातील फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटूंसह एकूण १६२ खेळाडूंच्या सहभागाने रंगलेल्या स्पर्धेत ९० विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.
आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना सहकार्यीत बँक ऑफ बडोदा चषक बुद्धिबळ स्पर्धेमधील ८ वर्षांखालील गटात झियान नागरेचाने (४.५ गुण) प्रथम, मानवा पारकरने (४ गुण) द्वितीय, ईशी सिंगने (४ गुण) तृतीय, रिहान दुबेने (४ गुण) चौथा, हस्ती शाहने (३.५ गुण) पाचवा, जितेज गाडगेने (३ गुण) सहावा; ११ वर्षाखालील गटात शिवांश गिरीने (४.५ गुण) प्रथम, धैर्य बिजलवानने (४ गुण) द्वितीय, श्लोक पवारने (४ गुण) तृतीय, मृण्मयी डावरेने (४ गुण) चौथा, नैतिक पालकरने (४ गुण) पाचवा, लक्ष परमारने (३.५ गुण) सहावा तर १४ वर्षाखालील गटात अथर्व देशमुखने (४.५ गुण) प्रथम, अरीहा देवरुखकरने (४ गुण) द्वितीय, मुमुक्षु मिटकरने (४ गुण) तृतीय, निव विंगोलेने (३.५ गुण) चौथा, आद्विक अग्रवालने (३.५ गुण) पाचवा, अर्जुन पधारीयाने (३.५ गुण) सहावा पुरस्कार जिंकला.