
सांगली ः सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय वकील व न्यायाधीश यांच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा बार असोसिएशन संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत सातारा जिल्हा बार असोसिएशन संघाने मुंबई, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, यवतमाळ, ठाणे, पुणे सोलापूर या संघांना पराभूत करत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या स्पर्धेत अॅड प्रणव टांगसाळे यांनी वैयक्तिक स्पर्धेत उपविजेतेपद संपादन केले.