
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा गेम्स’ अंतर्गत जिल्हास्तरीय वयोगट जलतरण स्पर्धा २०२५ महानगरपालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलाव येथे १७ ऑगस्ट रोजी स्विमिंग अससोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या तांत्रिक सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडली.
ही स्पर्धा अंडर ८, १०, १२, १४, १७ या वयोगटाखालील मुले व मुली यांच्यात घेण्यात आली होती. महानगरपालिकेच्या महा गेम्स अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील शालेयस्तरा वरील २५० खेळाडूंनी सहभागी होत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.
या स्पर्धेस महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उद्यान अधीक्षक विजय पाटील व जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी आदींनी अभिनंदन शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीतसाठी पंच व आयोजक यांनी परिश्रम घेतले.