छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वार्षिक क्रीडा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन कुलगुरू प्रोफेसर डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. ही बैठक मंगळवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाचे मुख्य नाट्य सभागृह, विद्यापीठ परिसर येथे होणार आहे.
या बैठकीत विद्यापीठाच्या वार्षिक आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे स्थळ निश्चित करणे, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या ध्येय धोरण व नियमावलीची माहिती देणे, मागील २०२४-२०२५ वर्षातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील तसेच क्रीडा महोत्सव क्रीडा स्पर्धेतील नैपुण्य प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचा ब्लेझर व रोख रक्कम देऊन गुणगौरव करणे ईत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.
विद्यापीठाच्या वतीने चारही जिल्ह्याच्या संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यां मार्फत त्यांच्या कडील कार्यरत क्रीडा प्राध्यापक, क्रीडा संचालक आदींना बैठकीत उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले असून बैठकीच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील क्रीडा प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, डॉ अभिजित दिख्खत, किरण शूरकांबळे, गणेश कड, रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार आदी परिश्रम घेत आहेत.
Super