जालना क्रीडा कार्यालयातर्फे खेळाडूंना आवाहन

  • By admin
  • August 20, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

जालना ः हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहचविणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, युवक व युवतींमध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी विविध उपक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येतात.

जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पात्र खेळाडूंनी आपल्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत २५ ऑगस्ट पर्यत कार्यालयाच्या jalnadso@gmail.com वर Email करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *