
एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाने आयोजित केलेल्या क्रॉसकंट्री स्पर्धेत ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग
डेरवण (चिपळूण) ः मुसळधार पावसात स्पर्धकांच्या उत्साहामुळे ११वी भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धा जल्लोषात पार पडली. डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाने आयोजित केलेल्या या क्रॉसकंट्री स्पर्धेत ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

गेले ४ दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे स्पर्धा आयोजनाबाबत शाशंकता निर्माण झाली होती. मात्र धावपटूंच्या उत्साहामुळे ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न झाली. रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने १२, १४, १६ व १८ वर्षाखालील मुले व मुली अशा ८ गटात स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम ५ क्रमांकाच्या खेळाडूना ५५ हजार रुपयांची रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व खेळाडूना टीशर्ट व अल्पोपहार देण्यात आले.
११ व्या भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय धावपटू शिवानी गायकवाड हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरयू यशवंतराव, डॉ नेताजी पाटील, डॉ चंद्रशेखर एल, अजित गालवणकर, संदीप तावडे, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जगदीश नानजकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक)
१२ वर्षांखालील मुले ः समर्थ सुर्वे, वेदित मोरे, अद्वित निकम, प्रणम्य शेंबेकर, आर्य थोरात. मुली ः ईश्वरी मुळे, ईश्वरी गरुड, सुभद्रा कांबळे, प्रांजल घुमे, रचना शेवडे.
१४ वर्षांखालील मुले ः श्रवण साळुंखे, वीर मेटकर, राज यादव, पार्थ कदम, अथर्व दवंडे. मुली ः अबोली वास्के, चक्षुका लाडे, समीक्षा गुजाळे, तनिष्का माने, सायली गोंडल.
१६ वर्षांखालील मुले ः पृथ्वी राजभोर, सिद्धेश कुरणे, रुद्र बरजे, सुमित रेवाळे, विपुल साळवी. मुली ः अंजली काळभोर, प्राप्ती तराळ, गौरी क्षितप, नियती बने, साजिरी पावस्कर.
१८ वर्षांखालील मुले ः अथर्व तळे, सपोहम साळुंखे, आर्यन नारवेकर, युवराज गावडे, मयूर सोयने. मुली ः रिया गोंडल, मेघा सातपुते, श्वेता नवले, आरोहि पालखडे, मंजिरी गावडे.