मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्टला

  • By admin
  • August 20, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

मुंबई ः मुंबई शहर कबड्डी असोसिएशनची सन २०२४-२५ ची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी सकाळी १० वाजता भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, मुंबई ४०००३१ येथे आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनला संलग्न असलेल्या सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा संघटनेचा सन २०२४-२५चा वार्षिक अहवाल व जमाखर्च आपल्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविला आहे. ज्या संघटनाना अद्यापही हा अहवाल मिळाला नसेल अशा संघटना करिता तो जिल्हा असोसिएशनच्या www.mumbaishaharkabddi.com. या वेबसाईट वर उपलब्ध आहे. शिवाय आपण कार्यालयीन वेळेत मुंबई शहरच्या कार्याल्यात येऊन तो घेऊ शकता. सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून सभा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे पत्रकाद्वारे संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *