
छत्रपती संभाजीनगर ः चंद्रपूर येथे होणार्या सहाव्या सीनियर राज्यस्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या संघात १० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सहाव्या सीनियर जिल्हास्तरीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ घोषित करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात शाम देशमुख (फॉरवर्ड बेंड), शंतनु बोडके (आर्टिस्टिक सिंगल ,सुपाईन), कशिश गुप्ता (आर्टिस्टिक पेयर), कृष्णिका महाजन (आर्टिस्टिक पेअर, हॅड बॅलन्स वैयक्तिक), जयश्री इंगळे (लेग बॅलन्स), सपना खंबाडकर (फॉरवर्ड बेंड), नेहा धामणे (सुपाइन), माऊली वायकर (ट्रॅडिशनल वैयक्तिक), बाबासाहेब लोखंडे (हॅड बॅलेन्स) व साक्षी पोखरकर (ट्विस्टिंग बॉडी) या खेळाडूंचा समावेश आहे.
या संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून रुपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या संघाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशानचे अध्यक्ष डॉ गजानन सानप, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, सचिव सुरेश मिरकर, उपाध्यक्ष मंदाकिनी जगताप, तांत्रिक अधिकारी छाया मिरकर, कृष्णा तोंडे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.