
नवी दिल्ली ः नवी दिल्ली येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे पार पडलेल्या पहिल्या हीबॉल १९ वर्षाखालील ज्युनियर राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या आरव संचेती याने विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत अंतिम लढतीत पुण्याच्या आरव संचेती याने कर्नाटकच्या करण शेषाद्री याचा ७-३ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. याआधी उपांत्य फेरीत आरव याने अब्दुल सैफ यांचा ७-६ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर, उपांत्यपूर्व फेरीत आरव याने गुजरातच्या मुआवियाचा ५-३ असा पराभव केला.