शनिवारी उद्घाटन
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने ’संगम-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (२३ ऑगस्ट) सकाळी ९.३० वाजता या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास राज्याच्या माजी मुख्यसचिव श्रीमती सुजाता सौनिक, आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, ’संगम-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे तिसरे वर्ष असून आरोग्य सेवा व संशोधन विषयक उपक्रमांविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. सार्वजनिक आरोग्याबाबतीत येणाऱ्या समस्यांचा उहापोह परिषदेत करण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात ही परिषद दिशादर्शक ठरणार आहे.
कुलगुरू पुढे म्हणाल्या की, सार्वजनिक आरोग्यातील नवे कल आणि आव्हाने चर्चा करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषदेचे महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रात कौशल्ये विकसित करणे, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर, आरोग्याचे आंतरराष्ट्रीय अर्थकारण, तंत्रज्ञान आणि वृध्दापकालीन आरोग्य सेवा या विषयांचा परिषदेत समावेश आहे. या परिषदेत प्रि-कॉन्फरन्स घेण्यात येणार असून परिषदेदरम्यान पोस्टर प्रेझेन्टेशन व सायंटिफिक प्रोग्राम यांचा समावेश आणि डिजिटल हेल्थ या संकल्पनांना नवीन आयाम देतील असे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, या परिषदेत हेल्थ टेक्नोलॉजी असेसमेंट, इनोव्हेशन इंटरप्रिन्युरोशिप, जीओस्पॅटीअल इंन्फॉरमेशन सायन्स फॉर पब्लीक हेल्थ या विषयांवर विविध सत्रे आयोजित करण्यात आले आहेत याचबरोबर पेपर प्रेझेन्टेशनही करण्यात येणार आहे. या आंतराष्ट्रीय परिषदेत हेल्थ केअर, इकॉनॉमिक्स, हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंट, इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ ऑण्ड मेडिकल इक्युपमेंट ऑट अर्फोडेबल कॉस्ट आणि पॅलिएटिव्ह ऑण्ड जिरिएटिक हेल्थ केअर सोल्युशन या थीमवर परिषद संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.