
सेलू ः महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने सेपक टकरॉ असोसिएशन ऑफ परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय सेपक टकरॉ सब ज्युनियर आणि ज्युनियर (मुले-मुली) स्पर्धा व निवड चाचणी शनिवारी (२३ ऑगस्ट) दुपारी एक वाजता नूतन विद्यालय सेलू आयोजित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय सब ज्युनियर व ज्युनियर सेपक टकरॉ स्पर्धा नांदेड येथे २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी या निवड चाचणी स्पर्धेतून परभणी जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. या निवड चाचणीत सब ज्युनियर (मुले/मुली) १ जानेवारी २०११ आणि ज्युनियर (मुले/मुली) हे १ जानेवारी २००६ नंतर जन्म झालेला असावा. अधिक माहितीसाठी अनुराग आंबटी (8830073631), कैलास टेहरे (9860914540) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणीत परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजेश दादा विटेकर, उपाध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष नितीन लोहट, सचिव गणेश माळवे, प्रशांत नाईक, मोहम्मद इक्बाल, सज्जन जैस्वाल, अन्सार सत्तार, बाबासाहेब राखे, शेख शकील आदींनी केले आहे.