जालना ः नाशिक येथे होणाऱ्या ३५ वी किशोर-किशोरी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्हा संघाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी जय किसान क्रीडा मंडळ अकोला (तालुका बदनापूर) येथे आयोजित करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा मंडळे, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी. किशोर-किशोरी निवड चाचणी स्पर्धेकरिता खेळाडूंचे वजन ५५ किलोच्या आत असावे, जन्म तारीख ०१-०१-२०१० पासून असावी, आधार कार्ड, शाळेचे बोनाफाईड, खेळाडूंचे अलीकडच्या काळातील चार पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन राजू थोरात, तुकाराम दौंड, अंबादास गिते, दिलीप मुंडे, प्रदीप सांगळे, परमेश्वर गिते, उद्धव गिते, गजानन नागरे, संदीप केकान, लक्ष्मण ढाकणे गुठे, सोमीनाथ शिंदे, विशाल मुंडे, योगेश जाधव, पवन मुंडे, योगेश बनसोडे यांनी केले आहे.