
राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे कुलगुरू विलास सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या कॅडेट (१७ वर्षांखालील) राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेला शुक्रवारी साई क्रीडा प्रशिक्षण केेंद्राच्या तलवारबाजी सेंटरमध्ये शानदार सुरुवात झाली. इप्पी प्रकारात लातूर, सोलापूर, बुलढाणा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या संघांनी विजय नोंदवले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ यांच्या हस्ते करण्यात येणार आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालिका डॉ मोनिका घुगे, सहाय्यक उपसंचालक सुमेध तरोडेकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, राज्य संघटनेचे प्रकाश काटुळे, शेषनारायण लोढे, सुनील कुरंजेकर, जिल्हा संघटनेचे डॉ दिनेश वंजारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलढाणा, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, नागपूर, भंडारा, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंनी पंच व पदाधिकारी मिळून ५७६ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ. उदय डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश वंजारे यांनी केले.
पारितोषिक वितरण
शुक्रवारी झालेल्या सामन्याचे बक्षीस वितरण वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इस्टेट इंजिनियर जय देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तुकाराम मेहत्रे, सागर मगरे, तुषार आहेर, अजय त्रिभुवन, स्वप्नील तांगडे, शिल्पा नेने, अमृता भाटी, राहुल दणके, जयदीप पांढरे, आशिष डांगरे, विशाल दानवे आदी प्रयत्नशील आहेत.
महत्त्वाचे निकाल
इप्पी प्रकारातील सांघिक निकाल
इप्पी मुले ः प्रथम लातूर, द्वितीय सोलापूर, तृतीय बुलढाणा, तृतीय नाशिक.
इप्पी मुली ः प्रथम लातूर, द्वितीय नाशिक, तृतीय छत्रपती संभाजीनगर, तृतीय सोलापूर.