
छत्रपती संभाजीनगर ः मौलाना आझाद महाविद्यालयाचा खेळाडू मोहम्मद मोईन याने जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून स्पर्धा गाजवली.
मौलाना आझाद कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या मोहम्मद मोईन याने पीईएस कॉलेज मैदानावर झालेल्या जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या १८ वर्षांखालील गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मजहर अहमद फारुकी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य शेख अब्बास, क्रीडा विभागाचे प्रमुख अकबर खान आणि डॉ हसन झमा खान यांनी मोहम्मद मोईन याचे कौतुक केले आहे.