
डॉ अनुराग अग्रवाल यांचे प्रतिपादन
नाशिक ः आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक वापर केल्यास अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल असे प्रतिपादन अशोका युनिव्हर्सिटीचे बायोसाइंसेसेस आणि हेल्थ रिसर्चचे अधिष्ठाता डॉ अनुराग अग्रवाल यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने ’संगम-२०२५’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या ’थीम टॉक’ मध्ये डॉ अनुराग अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्याच्या माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक, विद्यापीठाच्या कुलगुरू लेपटनन्ट जनरल माधुरी कानिटकर, प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशोका युनिव्हर्सिटीचे बायोसाइंसेसेस आणि हेल्थ रिसर्चचे अधिष्ठाता डॉ अनुराग अग्रवाल यांनी सांगितले की, हेल्थ टेक्नोलॉजीमध्ये आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. आरोग्य तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या वापरातून आजच्या युगात तंत्रज्ञान केवळ सुविधा पुरवत नाही तर ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे. त्याचा वापर करुन आरोग्य तपासण्या अधिक चांगल्या आणि प्रभावी बनवता येतील. हे तंत्रज्ञान अत्यंत संवेदनशील असून संशोधनामध्ये सकारात्मकता देऊ शकते ज्यामुळे अचूक निदान करण्यास मदत होईल.
ते पुढे म्हणाले की, समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर महत्वाचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन काम अधिक वेगाने आणि चांगल्या प्रकारे आरोग्य क्षेत्रात काम करता येणे शक्य आहे. आजचे तरुण वैज्ञानिक या तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ताच्या इतिहासावर आणि डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क, कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क या बाबी महत्वाच्या आहेत. तंत्रज्ञान आणि मानवी आरोग्याच्या भविष्याचे साधन असून मानवी आरोग्य सेवांमध्ये क्रांती घडवून आणणारे एक शक्तिशाली तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले.
संगम-२०२५ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या थीम टॉक मध्ये डॉ. सुप्रिया पालवे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. महेंद्र पटाईत यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, संशोधक, अभ्यागत, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.