
सामाजिक कार्यामुळेच सक्षम समाज घडतो – शिवाजी राजे जाधव
नाशिक ः दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने कोंडाजी नामदेव दुधारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजरत्न आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कालिका देवी मंदिर सभागृह, जुना आग्रा रोड, नाशिक येथे करण्यात आले होते. या सोहळ्यात आदर्श शिक्षक व समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या १७ व्यक्तींना ‘समाजरत्न पुरस्कार’ आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरीसाठी २३ शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लखूजीराजे जाधव यांचे १३ वे वंशज शिवाजी राजे जाधव हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी कालिका माता ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील होते. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना शिवाजी राजे जाधव यांनी आयोजकांचे कौतुक केले आणि सामजिक कामामुळे समाज घडतो असे सांगितले. विजया दुधारे यांनी सूत्रसंचालन आणि यादी वाचन केले. दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक दुधारे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, विक्रम दुधारे यांनी आभार प्रदर्शनाचे काम केले.
या प्रसंगी नारायण दुधारे, अनुसया गोल्डे, त्र्यंबक दुधारे, दीपक निकम यांच्यासह दुधारे परिवार विविध संस्थाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात निवड झालेल्या समाजरत्न आणि गुणवंत शिक्षकांचा फाउंडेशनतर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये डॉ. सोपान क्षीरसागर (नांदेड), चंद्रकांत बनकर, प्रमोद जाधव (पालघर), देविदास पवार, चेतन शेलार (नाशिक), विलास पंचभाई (नाशिक), सुभाष शिंदे (चांदवड), उत्तम कोळगावकर (नाशिक), दुर्गा शिंदे (जालना), राजेंद्र जडे, माधव सोनवणे (नाशिक), उल्हास धनवटे, छगन कळले, कल्याणराव देशमुख, शाम मोगल, पी. बी. वाघ (नाशिक), संजय वाळके (जालना) यांचा सामावेश होता. तर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ यासाठी अशोक कुमार कांजीभाई, रश्मिकांत पटेल, अमित चंदूभाई पटेल, अनिल कांबळे, डॉ उज्वला साळवे, सुभाष गवई, डॉ नितेश राऊत, डॉ नीता राऊत, विशाखा जोशी, डॉ. सुगंध बंड, तातेबा काळे, कंकर सिंग टाक, अनघा कुलकर्णी, राख गिनेनदेव, प्रवीण ठोंबरे, उषा साळवीकर, कॅप्टन श्वेता मेंढे, डॉ नानासाहेब सपकाळ, डॉ कामिनी मामुर्डे, संजय बोचे, डॉ उल्हास भामरेक, डॉ गोविंद वाकणकर, श्रीकृष्ण कवडी यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.