
धुळे ः साक्री तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.
तालुका क्रीडा स्पर्धेत १४ वर्षांखालील कॅरम, १७ वर्षांखालील कॅरम व १७ वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक अविनाश भदाणे, पंकज पाटील, नरेंद्र सोनवणे, महेंद्र साबळे, प्रसाद भाडणेकर, लक्ष्मीकांत देवरे, सतिष नेरे, कुणाल नांद्रे, जयश्री वसावे, सुरेखा सूर्यवंशी यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद बेडसे, उपमुख्याध्यापक विलास गोसावी, पर्यवेक्षक अविनाश सोनार, बन्सिलाल बागुल, सतिष सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक सुरेश मोहने, मीना सुर्यवंशी आदींनी केले.