
छत्रपती संभाजीनगर ः पोलिस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरतर्फे रविवारी (२४ ऑगस्ट) सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार व फीट इंडिया मोहीम अंतर्गत पोलिस आयुक्तालयातर्फे सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात पोलिस आयुक्त कार्यालय येथून रविवारी सकाळी साडेसहा वाजता होईल. त्यानंतर बाबा पेट्रोल पम्प चौक, क्रांतीचौक, सेव्हन हिल्स उड्डाण पूल व पुन्हा त्याच मार्गाने पोलिस आयुक्तालय कार्यालय असा स्पर्धेचा मार्ग असेल.
या सायक्लोथॉन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व सायकलपटू, महाविद्यालयीन विद्यार्थी, सायकल संघटना यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६४५६८६३६, ८४२१४९०७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.