
नाशिक (विलास गायकवाड) ः सतरा वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. सिंधुदुर्ग संघ उपविजेता ठरला तर सोलापूर जिल्हा संघाने तिसरा क्रमांक संपादन केला.
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित १७ वर्षांखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत ठाणे संघाने विजेतेपद मिळवले. सिंधुदुर्ग संघ उपविजेता ठरला. सोलापूर संघाने तिसरा तर सातारा संघाने चौथा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी व सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील,
महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, सहसचिव चंद्रकांत तोरणे, महिला अध्यक्षा धनश्री गिरी, जिल्हा सचिव विलास गायकवाड, सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार, सिद्धेश गुरव, कुणाल हळदनकर, संदीप खलाणे, शेख शफी, सुशील तांबे, महेश मिश्रा, आनंद गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यातून एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन महासचिव मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व नियम सांगितले. मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मुंबई उपनगर, द्वितीय क्रमांक अमरावती संघाने मिळवला.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष कन्हैया गुजर व महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत पंच म्हणून विजय उमरे. लखन देशमुख, सोमा बिरादार, दर्शन थोरात, महेंद्र देशमुख, मानस पाटील, धनश्री गिरी, साक्षी गणे, रूतुजा तोरडमल, रोहिणी सकटे, धनंजय लोखंडे, सुनील मोर्यॊ, स्वप्नील यांनी काम पाहिले. राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई संघ सहभागी होणार आहेत.