
चाळीसगाव ः चाळीसगाव तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन के आर कोतकर ज्युनिअर कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये डॉ काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय चाळीसगावच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत याज्ञिक महेंदळेकर, लोकेश पाटील, भावेश पाटील, संकेत चौधरी, नरेंद्र पाटील, निशांत पाटील, देवदत्त अहिरे, श्लोक जगताप या सर्व खेळाडूंनी आपली उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवत विजय नोंदवला.
या स्पर्धेत काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे कॉलेजचे खेळाडू १४ व १७ वर्षांखालील गटात विजयी झाले असून त्यांची निवड जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. ही स्पर्धा जळगाव येथील श्री शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सर्व खेळाडूंना बॅडमिंटन प्रशिक्षक अमोल पाटील आणि क्रीडा शिक्षक हेमंत गोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या विजयामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यजित पूर्णपात्रे आणि संस्थेच्या सचिव डॉ शुभांगीताई पूर्णपात्रे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पारस परदेशी आणि सर्व शिक्षक बंधू-भगिंनींनी व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी या यशस्वी संघाचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.