छत्रपती संभाजीनगर, पुणे संघाला विजेतेपद 

  • By admin
  • August 23, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

राज्य तलवारबाजी स्पर्धेत स्वराज डोंगरे, यशश्री वंजारे, अनुष्का अंकमुळे, मानसी हुलसुरकर यांना पदके 

छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत फाईल सांघिक प्रकारात छत्रपती संभाजीनगर आणि मुलींमध्ये पुणे या संघांनी विजेतेपद पटकावले. वैयक्तिक प्रकारात छत्रपती संभाजीनगरचे स्वराज डोंगरे, यशश्री वंजारे तर अनुष्का अंकमुळे, मानसी हुलसुलकर यांनी पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटना व महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी कॅडेट राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील तलवारबाजी सेंटर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचा समारोप रविवारी होणाऱ्या स्पर्धेने होणार आहे.  

पारितोषिक वितरण कार्यक्रम

शनिवारी झालेल्या सामन्याचे बक्षीस वितरण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य गजानन सानप, परीक्षा नियंत्रक डॉ बी एन डोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ फुलचंद सलामपुरे, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, प्रकाश काठोळे, शेषनारायण लोंढे, सुनील कुरंजेकर, विलास वाघ, मोहम्मद शोएब , दत्ता गलाले, केदार ढवळे, राजकुमार सोमवंशी, राजू शिंदे, दिनेश वंजारे आदींची उपस्थिती होती.

 स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तुकाराम मेहत्र, सागर मगरे, तुषार आहेर, अजय त्रिभुवन, स्वप्नील शेळके, महेश तवार, आकाश आरमार, स्वप्नील तांगडे, शिल्पा नेने, राहुल दणके, जयदीप पांढरे, विश्वजीत कुलकर्णी आदी प्रयत्नशील आहेत.

महत्त्वाचे निकाल 

फॉइल वैयक्तिक ः  १. स्वराज उदय डोंगरे (छत्रपती संभाजीनगर), २. कार्तिक रामप्रसाद चटप (बीड), ३. रुद्र सूर्यकांत सराडे (सोलापूर), ३. मयंक अभयकुमार जैन (नाशिक).

फॉइल टीम (मुले) ः १. छत्रपती संभाजीनगर (स्वराज उदय डोंगरे, देवेन रवींद्र पाथ्रीकर, हर्षवर्धन राजन भामरे, वेदांत गिरीशकुमार सहाणे), २. नाशिक (विराज विकास केंद्रे, मयंक अभयकुमार जैन, चौधरी शुभम रविदास, वसावे प्रशांत जयवंत), ३. धाराशिव (उन्मेष दिगंबर सराडे, प्रशांत कमलाकर धवणे, निशांत संतोष काशीद, भार्गव राहुल भंडारे), ३. भंडारा (क्रिश रोहित यादव, आदर्श शत्रुघ्न काधव,  झोराईज नसीम खान, अनय अजय नागपुरे).

फॉइल वैयक्तिक (मुली) ः १. जिजाऊ जीवन पाटील (पुणे), २. यशश्री दिनेश वंजारे (छत्रपती संभाजीनगर), ३. अनुष्का सुनील अंकमुळे (छत्रपती संभाजीनगर), ३. मानसी दीपक हुलसुरकर (छत्रपती संभाजीनगर).

फॉइल टीम (मुली) ः १. पुणे (जिजाऊ जीवन पाटील, युविका सुबोध सायखेडकर,  शौर्य गणेश इंगवले, आर्या सुनील जाधव), २. नागपूर (कलश शंकर काकडे, कार्तिक विजय ढोबळे, अनुपम आशिषकुमार जगमोहन, सिद्धांत दिवाकर गुडधे), ३. छत्रपती संभाजीनगर (कानन सचिन भोजने, अनुष्का सुनील अंकमुळे,  मानसी दीपक हुलसुरकर, यशश्री दिनेश वंजारे), ३. भंडारा (स्वरा किशोर निमजे,  श्रीमाई अरविंद गभणे, अंजल जितेंद्र डोंगरे, शिबा विनोद बागडे). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *