
सोलापूर : प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून सन २०२४-२५ या वर्षात अति उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्य लेखापाल संध्याराणी बंडगर यांना गौरविण्यात आले.
राज्यातील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या टेनिसपटू संध्याराणी बंडगर, मुख्य लेखापाल यांचे सन २०२४-२५ मधील कामाचे एकूण १० बाबींच्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने त्यांना विभाग स्तरावर तसेच वृत्तस्तरावर पात्र ठरवून अति उत्कृष्ट मुख्य लेखापाल म्हणून निवड करून गौरविण्यात आले. हे प्रशस्ती पत्र १५ ऑगस्ट २०२५ रोजी विभागीय वन अधिकारी शुभांगी जावळे यांच्या हस्ते देण्यात आले. क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातील व कार्यालयीन जबाबदारीत त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव राजीव देसाई यांनी अभिनंदन केले.