
पुणे : कॅनडा येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे.
अमेरिकेच्या संघाचा ६-० ने दणदणीत विजय नोंदवून १८ वर्षांखालील रिकर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्य पदकाचा पराक्रम केला आहे. पात्रता फेरीत भारत चौथ्या स्थानावर होता. उपउपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको संघावर ६-० ने सेटने पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघाचा ५-३ सेटने पराभव भारताने उपांत्य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली. ६-२ सेटपर्यंत लढत रंगली. अखेर १ गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.
कांस्य पदकाच्या लढतीत अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. ५५-५३, ५९-५६, ५५-५२ गुणांसह ६-० सेटने भारताने ऐतिहासिक कांस्य पदकाचर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा रणजित चामले हे या संघाचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्या प्रोत्साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्या गाथा खडके हिने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्या गाथा खडके, पुण्याच्या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्या जियाना कुमार हिचा समावेश होता.
खेळाडूंसाठी धावले महाराष्ट्राचे मंत्री
कॅनडाला रवाना होण्यासाठी भारतीय संघांचे विमाना १५ ऑगस्ट रोजी होते. परंतु एअर कॅनडाचा संप झाल्यामुळे भारताच्या संघ ४ दिवस विमानतळावरच अडकून पडला होता. भारतीय तिरंदाजी संघटना आणि साईने यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर महाराष्ट्राचे केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडके आणि मुरलीधर मोहोळ खेळाडूंच्या मदतीला धावले. या मराठमोळ्या मंत्र्यांच्या प्रयासाने प्रयत्न खेळाडूंना वेळेवर कॅनडाला रवाना झाले. संघाचे मार्गदर्शक रणजीत चामले हे स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता कॅनडात पोचलले. नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली केल्याने क्रीडा मंत्रालय व साईकडून खेळाडूंचे कौतुक होत आहे.