
पुणे ः खेलो इंडिया अस्मिता तायक्वांदो लीग स्पर्धा पुणे येथे मोठ्या उत्साहात घेण्यात आली. या स्पर्धेत एक हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, महाराष्ट्र ऑलिम्पिकचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप गंधे, खजिनदार धनंजय भोसले, मॉडर्न कॉलेजच्या प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे, क्रीडा अधिकारी वैशाली दरवडे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सरचिटणीस अमजद खान (गफार) पठाण, खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी, पुणे विभागाचे अध्यक्ष नितीन गुंडा, कार्याध्यक्ष हेमंत इंगळे, सचिव दत्तात्रय कदम, उपाध्यक्ष प्रणव निवंगुणे, खजिनदार सुमित खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास सुरज जाधव, सुरेश राठोड, जयेश मातंग, डेव्हिड गौडर, अनुष्का झगडे, अश्विनी तिरमखे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एक हजारांहून अधिक महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यामुळे खेलो इंडिया उपक्रमा अंतर्गत आयोजित तायक्वांदो लीग ही महाराष्ट्रातील एक भव्य व ऐतिहासिक क्रीडा सोहळा ठरला आहे. उत्कृष्ट आयोजन आयोजकाद्वारे करण्यात आले आहे. महिलांसाठी स्वसंरक्षण धडे देणे व त्यांना सदृढ, भयमुक्त करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे तो आम्ही तायक्वांदो असोसिएशन महाराष्ट्रातर्फे साकार करत आहोत, असे अध्यक्ष संदीप ओम्बासे यांनी सांगितले.