छत्रपती संभाजीनगर, लातूर सर्वसाधारण चॅम्पियन

  • By admin
  • August 24, 2025
  • 0
  • 177 Views
Spread the love

राज्य तलवारबाजी स्पर्धेचा शानदार समारोप, खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर ः राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या गटात छत्रपती संभाजीनगर आणि मुलींच्या गटात लातूर या संघांनी विजेतेपद पटकावले. मुलांच्या गटात रायगड आणि मुलींच्या गटात पुणे या संघांनी उपविजेतेपद संपादन केले.

साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील तलवारबाजी हॉलमध्ये राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा तीन दिवस रंगली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी अर्थ राज्यमंत्री आणि खासदार डॉ भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या उपसंचालिका डॉ मोनिका घुगे, सहाय्यक संचालक सुमेध तरोडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस प्रा. उदय डोंगरे, उद्योजक मिलिंद पाटील, समाजसेवक डॉ भीमराव हत्ती अंभोरे, जिल्हा संघटनेचे डॉ दिनेश वंजारे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, दत्ता गलाले, केदार ढवळे, भागुराव जाधव आदींची उपस्थिती होती. राज्य स्पर्धेच्या समारोपाचे प्रास्ताविक डॉ उदय डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ दिनेश वंजारे यांनी केले.

स्पर्धेच्या अंतिम दिवशी सायबर प्रकारात अन्वर सय्यद (रायगड), श्रेयश कुरंजेकर (भंडारा), सन्मय क्षीरसागर (छत्रपती संभाजीनगर), आरव नागदेवे (भंडारा) यांनी वैयक्तिक पदके जिंकली. सांघिक प्रकारात रायगड संघ चॅम्पियन ठरला. या संघात सय्यद अन्वर हुसेन, रायन गौरव रावेशिया, वेदांत पाटील, अद्वैत दिनक या खेळाडूंचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर संघ उपविजेता ठरला. या संघात सन्मय क्षीरसागर, रुजल वनारसे, स्पर्श जाधव, रुषिकेश सोनार या खेळाडूंचा समावेश आहे. कांस्य पदक विजेत्या लातूर संघात शोएब आयुब शेख, शुभम कारंडे, तौफिक इब्राहिम शेख, करण राठोड यांचा समावेश आहे. तृतीय भंडारा संघात श्रेयश कुरंजेकर, सम्यक जंगले, हर्ष बांते, आरव नागदेवे यांचा समावेश आहे.

मुलींच्या गटात सायबर प्रकारात वैयक्तिक पदके वैष्णवी बेडवाल (नागपूर), हर्षदा झोंड (छत्रपती संभाजीनगर), शरण्य खार (रायगड), तनुजा लहाने (छत्रपती संभाजीनगर) यांनी जिंकली. सायबर सांघिक प्रकारात सोलापूरने सुवर्ण जिंकले. या संघात नंदिता नांदूरकर, प्रांजली कोरे, ज्ञानदा शिरवळ, मधुरा माळी यांचा समावेश आहे. रौप्य पदक विजेत्या रायगड संघात शरण्य खार, श्रीया शुक्ला, नंदिनी चौधरी, श्रीया तळेकर यांचा समावेश आहे. मुंबई उपनगर संघाने कांस्य जिंकले. या संघात साची यादव, इरा सिकदर, झारा ठक्कर यांचा समावेश आहे. नागपूर संघाने देखील कांस्य पदक पटकावले. या संघात दुर्वा बाराई, सान्वी नियोडिंग, वैष्णवी बेडवाल, अवनी बनकर यांचा समावेश आहे.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी तुकाराम मेहत्र, सागर मगरे, तुषार आहेर, अजय त्रिभुवन, स्वप्नील शेळके, स्वप्नील तांगडे, अमृता भाटी, विशाल दानवे, शिल्पा नेने, राहुल दणके, गिरीश धोंडफळे, अमोल गंगावणे, जयदीप पांढरे, विश्वजीत कुलकर्णी, ऋषिकेश पांचाळ, आदमान पठाण आदी प्रयत्नशील होते.

सांघिक अंतिम निकाल

मुलांचा गट ः १. छत्रपती संभाजीनगर, २. रायगड, ३. लातूर.

मुलींचा गट ः १. लातूर, २. पुणे, ३. सोलापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *