
राज्य ज्युदो स्पर्धेत लातूरच्या वेदांत, स्वप्नीलला पदके
लातूर ः लातूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत यजमान लातूरच्या वेदांत याने रौप्यपदक पटकावले. स्वप्नील याने कांस्य पदकाची कमाई केली. तसेच स्वरुप, विराज, वेदांत, प्रतीक, ओंकार, अर्जुन, आर्यन, देव आणि कुश यांनी बहारदार कामगिरी नोंदवली.
बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये पुनित बालन ग्रुप प्रस्तूत ५२ व्या राज्यस्तरीय सब ज्युनियर गटाची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे आयोजन प्रथमच लातूर शहरात होत असून यासाठी द लातूर ज्युदो संघटनेने सहकार्य केले आहे. १३ ते १५ वयोगटातील मुले आणि मुलींच्या स्पर्धेत २७ जिल्ह्यातील ३३४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
पहिल्या दिवशी मुलांच्या सर्व म्हणजे नऊ गटातील स्पर्धा झाल्या. त्यात यजमान प्रेक्षकांची वाहवा मिळवली ती पदक विजेत्या स्वप्नील आणि वेदांताच्या खेळीने. ६० किलोखालील लढतीत मुंबईच्या आर्यन खरे बरोबर झालेल्या लढतीत लातूरच्या वेदांत मुंडेनी आक्रमण करत चांगली खेळी केली. पण त्याला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात स्वरूप, विराज, वेदांत, प्रतिक, ओंकार, अर्जुन, आर्यन, देव आणि कुश यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली जागा निश्चित केली. मुलांच्या गटात मुंबईने दोन सुवर्ण पदक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तर द्वितीय क्रमांकावर ठाणे आणि कोल्हापूर तिसऱया क्रमांकावर राहिला.
महत्त्वाचे निकाल
३० किलोखालील मुले ः सुवर्ण विराज तरवडे, पीजेए, रौप्य शुभम भंडारी, ठाणे, कांस्य यश पगारे, धुळे, कांस्य अफान वर्षांनी, यवतमाळ.
३५ किलोखालील मुले ः सुवर्ण वेदांत परदाई, यवतमाळ, रौप्य विराज भगत, नाशिक, कांस्य अथर्व सानप, अमरावती, कांस्य आयुष चौधरी, क्रीडा प्रबोधिनी.
४० किलोखालील मुले ः सुवर्ण प्रतिक व्यवहारे, क्रीडा प्रबोधिनी, रौप्य प्रज्वल यादव, कोल्हापूर, कांस्य नक्षसिंग राजपूत, सांगली, कांस्य समर्थ राऊत, पीजेए.
४५ किलोखालील मुले ः १. सुवर्ण ओंकार काकड, छत्रपती संभाजीनगर, रौप्य अर्जुन नरोडे, क्रीडा प्रबोधिनी, कांस्य ओजस सुकळकर, वर्धा, कांस्य विश्वजित घाडगे, सांगली.
५० किलोखालील मुले ः सुवर्ण कुश पंडित, ठाणे, रौप्य युवराज चौधरी, नागपूर, कांस्य नीरज कांबळे, सांगली, कांस्य अर्श बालापुरे, यवतमाळ.,
५५ किलोखालील मुले ः सुवर्ण स्वरूप परदेसी, कोल्हापूर, रौप्य भुविक पुजारी, ठाणे, कांस्य श्रेयस दंडगव्हाळ, छत्रपती संभाजीनगर, कांस्य स्वप्नील सोनवणे, लातूर.
६० किलोखालील मुले ः सुवर्ण आर्यन खरे, मुंबई, रौप्य वेदांत मुंडे, लातूर, कांस्य हर्षवर्धन पाटील, कोल्हापूर, कांस्य उज्वल पहारे, अहिल्यानगर.
६६ किलोखालील मुले ः सुवर्ण अर्जुन चोडणकर, मुंबई, रौप्य शौर्याजित माळी, सांगली, कांस्य अथर्व मोरे, पीजेए, कांस्य पार्थ साप्ते, धाराशिव.
६६ किलोवरील मुले ः सुवर्ण देव गौतम, रायगड, रौप्य मनोज चौधरी, पीडीजेए, कांस्य प्रतीक मदाने, सोलापूर, कांस्य तरणजीत सिंग, अमरावती.