
नाशिक ः महाराष्ट्र राज्य अंडर १३ बुद्धिबळ स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील दहा वर्षीय प्रीषा घोलप हिने शानदार कामगिरी बजावत चौथा क्रमांक मिळवला.
या स्पर्धेत मोहाडीच्या प्रीषा घोलप हिने अनेक नामवंत खेळाडूंना पराभूत केले. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे प्रीषा घोलपच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात ५१ गुणांची भर पडली आहे. आता तिचे एकूण मानांकन गुण १६५५ झाले आहे.
प्रीषा घोलप ही जिनिअस चेस अकॅडमीची गुणवान खेळाडू असून तिला अकॅडमीचे संचालक ओंकार जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.