
छत्रपती संभाजीनगर ः दि महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन आयोजित सहाव्या ऑनलाइन जिल्हास्तरीय योगासन पंच परीक्षेत तेजल ठाकुर, योगिनी जाधव, वर्षा देशपांडे, वैद्यनाथ डोमाळे, दिनेश देशपांडे हे उत्तीर्ण झाले आहेत.
या पंच परीक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील २२ पंचांसह महाराष्ट्रातील जवळपास ९५० पंच प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. ही परीक्षा अध्यात्मिक योग थेरी व प्रॅक्टिकल पद्धतीने घेण्यात आली होती.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पंचांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गजानन सानप, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरकर, तांत्रिक अधिकारी छाया मिरकर यांनी अभिनंदन केले.