बेसबॉल स्पर्धेत मल्लिकार्जुन हायस्कूलचा दबदबा

  • By admin
  • August 25, 2025
  • 0
  • 32 Views
Spread the love

सोलापूर ः महादेव चषक बेसबॉल आमंत्रित  स्पर्धेत श्री मल्लिकार्जुन हायस्कूल संघाने चार गटात घवघवीत यश संपादन केले. 

सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल असोसिएशन व श्री मल्लिकार्जुन हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षे व १७ वर्षे मुले व मुली बेसबॉल जिल्हास्तरीय आमंत्रित स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सॉफ्ट फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजिनाथ हत्तुरे यांच्या हस्ते व जिल्हा सचिव प्रा संतोष खेंडे यांच्या अध्यक्षतेखाली व गंगाराम घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
     
या स्पर्धेप्रसंगी क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण, संतोष पाटील, सीताराम भांड, दुर्गेश यादव ,राजकुमार माने हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंच प्रमुख सागर जगझाप, महेश तेली, वीरेश कुंभार, साई कावळे, धीरज रायकोटी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्रा संतोष खेंडे यांनी केले. परमेश्वर चांदोडे यांनी आभार मानले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

१४ वर्षे मुले ः १. आय एम एस स्कूल, २. मल्लिकार्जुन हायस्कूल, ३. आयडियल स्कूल.

१४ वर्षे मुली ः १. आयडियल स्कूल, २. व्हॅलेन्टाईन्स स्कूल, ३. श्री मल्लिकार्जुन हायस्कूल.

१७ वर्ष मुले ः १. नूतन विद्यालय कुर्डूवाडी, २. श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, ३. सिद्धेश्वर कारखाना प्रशाला.

१७ वर्षे मुली ः १. श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, २. सिद्धेश्वर कारखाना प्रशाला, ३. व्हॅलेन्टाईन्स स्कूल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *