अध्यापक भारती व अध्यापक जागृती अभियानची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
येवला ः महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदव्युत्तर पदवी, सेट, नेट, पीएच डी, एमए एज्युकेशन, शिक्षण शास्त्र, सर्व विद्याशाखांच्या पदव्युत्तर पदवी (विद्यावचस्पती) धारक शिक्षक प्राध्यापकांना प्रशासकीय वर्ग १ व वर्ग २ गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी, प्राचार्य यांना जिल्हा परिषद गटात सामावून घ्यावे अशी मागणी अध्यापक जागृती अभियान शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या अभियानाचा संस्थापक अध्यक्ष डॉ नंदलाल बर्डे व अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक,उच्च माध्यमिक, पदव्युत्तर पदवी, सेट, नेट, पीएच डी, एमए एज्युकेशन, शिक्षण शास्त्र पदवी, सर्व विद्याशाखांची पदव्युत्तर पदवी धारक शिक्षक प्राध्यापकांना प्रशासकीय वर्ग १ व वर्ग २ गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, प्राचार्य यांना जिल्हा परिषद गटात सामावून घ्यावे, खाजगी अनुदानित सर्व शाळा विद्यालयात सरकारच्या नियमांचे पालन होते किंबहुना जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जे नियम लागू आहेत तेच खाजगी अनुदानित शिक्षकांना लागु असतात त्याच धर्तीवर खाजगी अनुदानित शिक्षकांना शैक्षणिक सेवा करण्याची संधी द्यावी तसा निर्णय घेऊन खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदव्युत्तर पदवी सेट नेट पीएचडी एमए एज्युकेशन शिक्षण शास्त्र पदव्युत्तर पदवी धारक शिक्षक प्राध्यापकांना न्याय द्यावा व सेवेची संधी द्यावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
सदरचा निर्णय लोककल्याणकारी होणार असून शासनास कुशल उच्चविद्याविभूषित शासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या शिक्षण विभागास लाभणार आहे.सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून विना विलंब सकारात्मक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यातील खाजगी संस्थांमधील अनुदानित शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदव्युत्तर पदवी सेट नेट पीएचडी एम ए एज्युकेशन शिक्षण शास्त्र पदवी तर पदवी धारक शिक्षक प्राध्यापकांना प्रशासकीय वर्ग १ व वर्ग २ गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी प्राचार्य यांना जिल्हा परिषद गटात सामावून घ्याल अशी मागणी अध्यापक जागृती अभियान शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या अभियानाचा संस्थापक अध्यक्ष नंदलाल बर्डे (9423704528) व अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ (9822645706) यांसह एस एन वाघ, व्ही डी सोनवणे, एस एल वाघेरे, प्रा विनोद पानसरे, प्रा प्रभाकर मासुळ, प्रा सरिता खोबरे, वनिता सरोदे, बाबासाहेब गोविंद, अमीन शेख, राजरत्न वाहुळ, प्रा के एस केवट, पी जे बारे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.