पाकिस्तानात जन्मलेल्या हाँगकाँगच्या बाबर हयातची जोरदार चर्चा 

  • By admin
  • August 26, 2025
  • 0
  • 46 Views
Spread the love

षटकार ठोकण्यात बाबर आझमपेक्षा बाबर हयात आघाडीवर 

नवी दिल्ली ः आशिया कप २०२५ चे काउंटडाउन सुरू झाले आहे. ९ सप्टेंबरपासून आशियाई संघ एकमेकांशी भिडतील. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. या सामन्यात क्रिकेटप्रेमींच्या नजरा फक्त एकाच खेळाडूवर असतील आणि तो म्हणजे बाबर हयात. नाव ऐकून आश्चर्य वाटू नका, हा पाकिस्तानचा स्टार बाबर आझम नाही तर हाँगकाँग संघाचा धडाकेबाज फलंदाज आहे, ज्याने विक्रमांमध्ये खऱ्या बाबरला मागे टाकले आहे.

क्रिकेट जगतात, पाकिस्तानचा बाबर आझम हा विराट कोहलीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जातो, परंतु आकडेवारी वेगळीच कहाणी सांगते. बाबर आझम याने १२८ सामने खेळणे असून त्यात ७३ षटकार ठोकले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १२९.२२ असा आहे. दुसरीकडे हाँककाँगच्या बाबर हयात याने ९५ सामने खेळताना तब्बल १३६ षटकार ठोकले आहे. त्याचा स्ट्राईक रेट १३१.२० असा आहे. 

म्हणजेच, पाकिस्तानच्या बाबर आझमपेक्षा कमी सामने खेळूनही, हयात याने जवळजवळ दुप्पट षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे, दोघांचाही सर्वोत्तम स्कोअर सारखाच आहे. दोन्ही खेळाडूंनी १२२ धावांची शानदार खेळी खेळली आहे. फरक एवढाच आहे की बाबर आझम सरासरीमध्ये पुढे आहे, परंतु बाबर हयात स्ट्राइक रेट आणि षटकारांमध्ये खूप पुढे आहे.

पाकिस्तानमध्ये जन्मलेला, हाँगकाँगकडून खेळला
५ जानेवारी १९९२ रोजी पाकिस्तानमधील पंजाब (हज्रो) येथे जन्मलेला बाबर हयात नंतर हाँगकाँगकडून खेळू लागला. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि त्याने त्याच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याने १६ मार्च २०१४ रोजी नेपाळविरुद्ध सामना खेळून टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले. २०१६ च्या आशिया कप क्वालिफायरमध्ये, हयातने शतक ठोकून इतिहास रचला आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा हाँगकाँगचा पहिला खेळाडू बनला.

बाबर हयात चर्चेत
यावेळी बाबर आझम पाकिस्तान संघाचा भाग नाही, म्हणून मथळे पूर्णपणे हयातवर आहेत. त्याची आक्रमक शैली आणि षटकार मारण्याची क्षमता आशिया कपमध्ये कोणत्याही मोठ्या संघासाठी धोक्याची ठरू शकते.

हाँगकाँग संघाच्या अपेक्षा

हाँगकाँग क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. संघ कर्णधार यासीम मुर्तझाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार असून बाबर हयातकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

हाँगकाँग संघ

यासीम मुर्तझा (कर्णधार), बाबर हयात, झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हान मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक-उल-रेहमान इक्बाल, किन्चिंत शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली मोहम्मद अरशद, अली मोहम्मद अरशद, अली मोहम्मद हा. वहीद, अनस खान, एहसान खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *