
पुणे ः येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या छोटेखानी दौऱ्यावर जाणार आहे. ह्या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळेल. कसोटी आणि टी-२० संघातून निवृत्ती घेतली असली तरीही अजून रोहित आणि विराट एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे हे दोघेही ह्या दौऱ्यात एकदिवसीय सामने खेळतील अशी क्रिकेट रसिकांना आशा आहे.
भारतीय संघाच्या दौऱ्याचा कार्यक्रम
पहिला एकदिवसीय सामना – रविवार, १९ ऑक्टोबर – पर्थ
दुसरा एकदिवसीय सामना – गुरुवार, २३ ऑक्टोबर – ऍडलेड
तिसरा एकदिवसीय सामना – शनिवार, २५ ऑक्टोबर – सिडनी
पहिला टी २० सामना – बुधवार, २९ ऑक्टोबर – कॅनबेरा
दुसरा टी २० सामना – शुक्रवार, ३१ ऑक्टोबर – मेलबर्न
तिसरा टी २० सामना – रविवार, २ नोव्हेंबर – होबार्ट
चौथा टी २० सामना – गुरुवार, ६ नोव्हेंबर – गोल्डकोस्ट
पाचवा टी २० सामना – शनिवार, ८ नोव्हेंबर – ब्रिस्बेन
क्रिककथा आणि ट्रॅव्हर्सी हॉलिडेज ह्यांच्यातर्फे खास ह्या दौऱ्यासाठी क्रिकेट टूरचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या खास क्रिकेट टूरमध्ये रसिकांना ३ टी-२० सामने दाखवण्यात येतील, तसेच ऑस्ट्रेलियामधील काही मैदाने, संग्रहालये ह्यांना देखील भेट देता येईल. ११ दिवसांच्या ह्या छोट्या टूरमध्ये काही क्रिकेट अभ्यासकांचा आणि क्रिकेटशी संबंधित काही विशेष पाहुण्यांचा देखील समावेश असेल, ज्यामुळे रसिकांना क्रिकेट गप्पा आणि किश्श्यांचा आनंद घेता येईल. रसिकांना क्रिकेट सोबतच ऑस्ट्रेलियामधील चार शहरांची भेट, तसेच इतरही काही महत्वाच्या स्थळांना भेट देण्याचा आनंद देखील घेता येईल.
या टूरमध्ये सहभागी व्हायचे असल्यास रसिकांनी ८३० ८९४ ५५०९ / ८४४ ६०३ ५५०९ / ८८५ ७०० ८२०५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा.