
सार्थक, कृष्णा, भूमिका, साची, श्रेयाची चमकदार कामगिरी
नाशिक ः नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे वर्चस्व गाजवले.
मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे १८ वर्षांखालील खेळाडूंसाठी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, एक किलोमीटर या प्रकारात सार्थक सणांसे याने सुवर्णपदक पटकावले. तसेच कृष्णा बोराडे याने एक किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक व हजार मीटर धावणे या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
तसेच मुलींच्या स्पर्धेत भूमिका नेहते हिने ४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक, २०० मीटर धावणे स्पर्धेत देखील सुवर्णपदक पटकावले. साची गोरांडेने १०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक तसेच २०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. श्रेया सिंग हिने १०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक मिळवले.
या घवघवीत यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ प्रशांत हिरे, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक डॉ अपूर्व हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ स्मिताताई हिरे, विश्वस्त डॉ संपदा हिरे, विश्वस्त डॉ अद्वय हिरे (पाटील), महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ योगिता हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस जगदाळे, उपप्राचार्य, डॉ सुचिता सोनवणे क्रीडा संचालक किशोर राजगुरू, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.