भावी पोलीस व सैनिकांसाठी मोफत जलतरण साक्षरता शिबिराचे आयोजन 

  • By admin
  • August 26, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून २९ ऑगस्टपासून जय जवान जय किसान निवासी क्रीडा संकुलतर्फे हर्सुल तलाव परिसरात करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात पाण्यात बुडून मृत्यू होण्याऱ्या अपघातांमध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन व पोलीस-सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यामध्ये योग्य वेळी, योग्य वयात,  योग्य पद्धतीने त्यांच्या आसपास असणाऱ्या धोकादायक जलस्रोतांची संपूर्ण माहिती व जणजागृती निर्माण व्हावी व जल हे जीवन आहे ते मृत्यूचे कारण ठरू नये म्हणून धोकादायक जलस्रोतांमध्ये जलतरण शिकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जलतरण तलाव किंवा सुरक्षित ठिकाणी
तज्ञ प्रशिक्षक किंवा अनुभव संपन्न व्यक्तीच्या देखरेखीखाली जलतरण शिकण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन, नेशन फस्ट डिफेन्स अकॅडमी, निर्भया डिफेन्स अकॅडमी व डिफेन्स करियर ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, महाविदयालयीन तरुण व भावी पोलीस-सैनिकांसाठी मोफत जलतरण साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कारण महाराष्ट्र पोलीस, तुरुंग पोलीस, राज्य राखीव पोलीस, रेल्वे पोलीस, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, बॉर्डर सेक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिर्झव्ह प्रोटेक्शन फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल, आसाम रायफल्स, टेक्निकल, नॉन टेक्नीकल इत्यादी लष्करी-निमलष्करी दलांमध्ये दरवर्षी हजारों पदांची भरती प्रक्रिया होत असते. या हजारो पदांचा लाभ घेण्यासाठी लाखों तरुण मुले – मुली प्रयत्नशील असतात. अशा पद्धतीच्या शासकीय नोकऱ्यांसाठी शासन नियमा नुसार स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. सर्व प्रकारच्या राज्य व केंद्रीय संरक्षण दलाच्या पोलीस व सैनिक जेडी पदासाठी होणाऱ्या भरतींसाठी लेखी परीक्षेसह मैदानी चाचणी अनिवार्य असते. तसेच मैदानी चाचणीत वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळ्या शारीरिक क्षमता चाचण्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे. गोळा फेक, लांब उडी इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो.

शालेय जीवनात व्यायाम न करणे, इतर मैदानी खेळांमध्ये सहभाग न घेतल्यामुळे अचानक या सर्व शारीरिक क्षमता, कसरती केल्यामुळे साहजिकच त्याचा भार पोलीस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्यांवर येतो. हा ताण घालवण्यासाठी, दमश्वासाची क्षमता वाढविण्यासाठी, मनोरंजन-टाईम पास म्हणून, व्यायामातील बदल म्हणून, ही तरुण मुले फुरसतीच्या वेळी त्यांच्या आसपास असणाऱ्या जलस्त्रोतांवर पोहण्यासाठी जातात. जाताना चार-पाच मित्रांच्या समुहामध्ये पोहण्यासाठी जातात. अशा ठिकाणी सर्वच तरुण, बिनधास्त व समवयस्क असल्यामुळे भीती हा प्रकार जाणवत नाही. थट्टा-मस्करी, मी इतरांपेक्षा किती वेगळा आहे, मित्रांचा आग्रह, व्यसन करून पोहण्याचा मोह इत्यादी अनेक कारणांनी अनोळखी जलस्त्रोतांमध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेण्याचा बेत असतो. पण अनोळखी जलस्त्रोत किती घातक असतात. अशा ठिकाणी पोहणे किती जीवघेणे होवू शकते याची कल्पना नसल्यामुळे आतापर्यंत असंख्य तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे वारंवार होऊ नये व भावी आयुष्यात पोलीस व सैन्य दलात भरतीचे स्वप्न पाहून देश सेवा करू इच्छिणाऱ्या होतकरु व मेहनती तरुणांसाठी आयोजित मोफत जलतरण साक्षरता शिबिराचा लाभ जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय व सर्वच प्रकारच्या डिफेन्स अकॅडमींनी घ्यावा असे आवाहन

राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी 95279 24646, 77768 44398, 96999 44712, 92263 45600 या क्रमांकावर संपर्क साधावा. 
या शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य संयोजक म्हणून अंजूषा मगर, पौर्णिमा भोसले, मंजूर मदार, समीर पूर्णपात्रे, रुतिक जगदाळे, जीत भोसले, विजय भोसले आदीपरिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *