
छत्रपती संभाजीनगर ः पैठण रोड यथील अग्रसेन विद्या मंदिर शाळेतील खेळाडूंनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश मिळवून पदकांची लयलूट केली.
या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक डॉ कैलास शिवणकर, अभिजित शिंदे, रवींद्र माळी, सोनी खरात, करिष्मा मोटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विजेत्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीबद्दल शाळा समितीचे विशस्त केशव लीला, विद्यमान अध्यक्ष सच्च्यानंद अग्रवाल, उपाध्यक्ष गोकुळ अग्रवाल, सचिव निधी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकज अग्रवाल, शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने व सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
या स्पर्धेत ध्रुविका पवार (सुवर्ण पदक), सत्यम राज (सुवर्ण पदक), शुभंकर पाटील (सुवर्ण पदक), श्रुती चरखा (रौप्य पदक), देवयानी मोकाटे (रौप्य पदक व कांस्यपदक), पृथ्वीराज मस्के (कांस्य पदक) यांनी आपापल्या प्रकारांत चमकदार कामगिरी बजावत पदकांची कमाई केली.