
जान्हवी जाधव, साईप्रसाद, जंगवाड, रोहिणी पाटील यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
लातूर ः छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व छत्रपती संभाजीनगर तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या २०व्या कॅडेट १७ वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील वर्चस्व कायम ठेवत ९ सुवर्ण पदक, ६ कांस्यपदक प्राप्त करून राज्यात अव्वल स्थान मिळवले. लातूरच्या ३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत जान्हवी गणपतराव जाधव हिने इप्पी प्रकारामध्ये सांघिक सुवर्णपदक तर वैयक्तिक प्रकारामध्ये सुद्धा सुवर्णपदक असे २ सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच रोहिणी देवराव पाटील हिने सुद्धा इप्पी प्रकारामध्ये सांघिक सुवर्णपदक तर वैयक्तिक कांस्यपदक असे २ पदके पटकावली आहेत.
मुलांमध्ये सुद्धा साईप्रसाद संग्राम जंगवाड या खेळाडूंनी सुद्धा सांघिक इप्पी या प्रकारामध्ये सुवर्णपदक तर वैयक्तिक प्रकारामध्ये कास्यपदक असे दोन पदक प्राप्त केले आहे. या तिन्ही खेळाडूंची उत्तराखंड येथील हलदवाने येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
लातूरच्या इप्पीच्या मुलीच्या संघामध्ये जान्हवी जाधव, रोहिणी पाटील, स्नेहा कश्यप, मयुरी वाघमारे या संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या संघामध्ये साईप्रसाद जंगवाड, वेदांत माने, साकिब शेख, उवेस शेख या संघाने सुद्धा सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या सेबर सांघिक या प्रकारामध्ये शुभम करंडे, करण राठोड, तोफिक शेख, शोएब शेख या खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली आहे.
या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा दत्ता गलाले, वजीरोद्दीन काजी, मोसिन शेख, रोहित गलाले, आकाश बनसोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत खेळाडूंचे जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर, शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपतराव माने, लातूर तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत मोरे, प्रशांत माने, वैभव कज्जेवाड, मेहफूज खान पठाण यांनी अभिनंदन केले आहे.