विद्यापीठाचा नावलौकिक वाढवणाऱ्या १२५ खेळाडूंसह प्रशिक्षकांचा सत्कार

  • By admin
  • August 27, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

विद्यापीठ वार्षिक क्रीडा नियोजन समितीची बैठक उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर ः डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा क्रीडा विभागाच्यावतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील क्रीडा नियोजन समितीच्या बैठकीत सव्वाशे खेळाडूंसह प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा गौरव सोहळा व बैठक झाली. यावेळी जागतिक ख्याती प्राप्त वेटलिफ्टर आणि प्रशिक्षक अनन्या पाटील, प्र-कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा संचालक उपस्थित होते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक व निवृत्त क्रीडा संचालकांचा गौरव यावेळी करण्यात आला.

त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अखिल भारतीय व पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत मागील शैक्षणिक वर्षातील नैपुण्य प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम व ब्लेझर देऊन व क्रीडा महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना ब्लेझर देऊन गौरविण्यात आले.

गौरवमूर्ती

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

तलवारबाजी ः अभय शिंदे (सुवर्ण पदक), निखिल वाघ (रौप्य पदक), तुषार आहेर (प्रशिक्षक), डॉ पांडुरंग रनमाळ (व्यवस्थापक).

तायक्वांदो ः नयन बारगजे (कांस्य पदक), लता कलवार (प्रशिक्षक).

जलतरण ः मयूर खलाटे (कांस्य पदक), डॉ जी सूर्यकांत (प्रशिक्षक).

बुद्धिबळ ः कांस्यपदक – संस्कृती वानखडे, भाग्यश्री पाटील, तनिष्का बोरामणीकर, सानिया तडवी, साचल बिहाणी, संघमित्रा बोदडे, विलास राजपूत (प्रशिक्षक), रेणुका बोरमाणीकर (व्यवस्थापक).

खो-खो पुरुष ः कांस्यपदक – सचिन पवार, रमेश वसावे, सोहन गुंड, तेजस सावंत, पेठे श्रीशंभू, विजय शिंदे, रोहित चव्हाण, ओंकार दळवी, अनंत सटाले, शाम डोभले, अनिकेत पवार, रुद्र थोपटे, अथर्व धने, भरतसिंग वसावे, रवी वसावे, डॉ युसूफ पठाण (प्रशिक्षक), डॉ कपिल सोनटक्के (व्यवस्थापक),

पिस्तूल शूटिंग ः रौप्यपदक – रिया थत्ते, कृष्णाली राजपूत, तेजस्विनी कदम, डॉ अस्मा परवीन (प्रशिक्षक), डॉ अभिजित दिखत (व्यवस्थापक).

पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा

बॅडमिंटन पुरुष ः कांस्यपदक – नागेश चामले, प्रथमेश कुलकर्णी, यश शहा, श्रावण दुधाळे, निनाद कुलकर्णी, सदानंद महाजन, तुषार शर्मा, प्रशिक्षक चेतन तायडे, व्यवस्थापक हिमांशू गोडबोले.

खो-खो महिला ः कांस्यपदक – प्राची जतनुरे, अमृता माने, गायत्री शिंदे, तन्वी उभे, गौरी मडके, तेजस्विनी काळे, संध्या सुरवसे, दीक्षा सोन्सुरकर, अमृता सुरवसे, आकांक्षा त्रिभुवन, शिवानी येंद्रवकार, प्राजक्ता मंडलिक, नम्रता गाडे, गौरी शिंदे, कांचन पवार, प्रशिक्षक डॉ रफिक शेख, व्यवस्थापक डॉ यास्मिन शेख.

हँडबॉल पुरुष ः कांस्यपदक – शुभम बच्चे, निखिल आगोने, प्रवीण दिंडे, बाबर धीरज, राहुल माने, राहुल गवळी, सुरज भोसले, परेश चौधरी, तुषार परदेशी, आदित्य बोडके, वैष्णव दीक्षांत, ऋषिकेश चौधरी, नवनाथ राठोड, राकेश वानखेडे, प्रसाद जाधव, भगवान झुबेर, प्रशिक्षक डॉ फेरोज सय्यद, सह-प्रशिक्षक अनिकेत निकाळजे, व्यवस्थापक डॉ सत्यजित पगारे.

२६ व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल पुरुष संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजयी पुरुष गटात कौशिक शेलोटकर, संकेत पाटील, जीवन पवार, सय्यद अर्षद अली, रिझवान शाह, प्रथमेश गंगावणे, प्रणय बोरकर, जीवक वाघमारे, सौरभ मांजरे, सय्यद मुजतहीद, रोहित पांडे व दुर्गेश सोनार यांचा समावेश होता. या संघास विद्यापीठाचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिजीत दिखत यांचे मार्गदर्शन लाभले तर संघ व्यवस्थापक म्हणून आशिष शुक्ला यांनी काम पाहिले.

विद्यापीठाच्या बुद्धिबळ खेळाच्या महिला संघाने स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघात संस्कृती वानखेडे, भाग्यश्री पाटील, तनिष्का बोरामणीकर, सानिया तडवी व संघमित्रा बोदडे यांचा समावेश होता. या संघास प्रशिक्षक म्हणून डॉ नेहा माने यांचे मार्गदर्शन लाभले. 

स्पर्धेतील अॅथलेटिक क्रीडा प्रकारात विद्यापीठाच्या पुरुष व महिला खेळाडूंनी  शानदार कामगिरी नोंदवली. त्यात किशोर मरकड (रौप्य पदक), अर्जुन शिंदे (रौप्य पदक), ओंकार पडवळ (रौप्य पदक), सुरेखा आडे (रौप्य पदक), कल्पना मळकामी (सुवर्ण पदक, रौप्य पदक) यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. पुरुष संघास डॉ सुहास यादव यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ प्रशांत तौर यांनी काम पाहिले. महिला संघासाठी प्रशिक्षक म्हणून डॉ सीमा मुंढे यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ राम जाधव यांनी काम पाहिले. 

विद्यापीठाच्या खो-खो पुरुष संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, विजयी संघात सचिन पवार, रमेश वसावे, सोहन गुंड, तेजस सावंत, श्रीशंभु पेठे, विजय शिंदे, रोहित चव्हाण, दळवी ओंकार, आनंद सताले, शाम शोभले, अनिकेत पवार व रुद्र थोपटे यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉ युसूफ पठाण व संघ व्यवस्थापक म्हणून डॉ हेमंत वर्मा यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यापीठाच्या बॅडमिंटन पुरुष गटाने स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला, विजयी संघात निनाद कुलकर्णी, प्रथमेश कुलकर्णी, सदानंद महाजन व सिद्धेश्वर वेदांत यांचा समावेश राहिला, तर संघास प्रशिक्षक म्हणून चेतन तायडे यांचे मार्गदर्शन लाभले तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ राजेश क्षीरसागर यांनी काम पाहिले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बास्केटबॉल पुरुष संघाने  स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक पटकावलेला बास्केटबॉल पुरुष संघात विपूल कड (कर्णधार), जयराज तिवारी, नरेंद्र चौधरी, अमन शर्मा, अनिमेश म्हस्के, साहिल सय्यद, सुमित पवार, अझमत खान, कृष्णकांत शिरोळे, सौरभ ढिपके, प्रणव कोलेश्वर, व आदित्य तळेकर यांचा समावेश आहे. या संघास डॉ जमीर सय्यद यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले, तर मुख्य प्रशिक्षक म्हणून  गणेश कड यांच्याकडे जबाबदारी होती.

बैठकीत विद्यापीठाच्या वार्षिक आंतर-महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे स्थळ व वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ अभिजीतसिंग दिखत तर डॉ मसूद हाश्मी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, डॉ सुरेंद्र मोदी, डॉ अभिजित दिखत, किरण शूरकांबळे, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वाहिलवार, रमेश सलामपुरे, विलास भालेराव, अशोक जिरे, अशोक गांगुले, जी एम श्रेष्ठी, पुनमचंद जावळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *