
छत्रपती संभाजीनगर ः आझाद अलीच्या शिक्षण संस्थेद्वारे दौलताबाद येथे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक आणि एमजीएम वस्तानवी उर्दु प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना अग्नीजन्य परिस्थिती निर्माण होऊन आगीचे संकट आल्यास अशा वेळी कशाप्रकारे स्वतःचे व इतरांचे रक्षण करवे हे समजून सांगण्यासाठी अग्निशामक पथक यांच्याकडून प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिका अग्निशामक अधिकारी विजय राठोड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनपा उपायुक्त शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक शफिक शेख, अग्निशामक दलाचे मोरे, राठोड, मोहम्मद दानिश हे कर्मचारी व शायनिंग स्टार शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अमरीन खान व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख जाकीरया व इतर शिक्षक उपस्थित होते.

यावेळी शाळेतील सहशिक्षक दिनेश म्हस्के यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक साजीद पाशा यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व साहित्यासह आलेल्या अग्निशामक पथकाकडून आग विझवण्याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व वेळप्रसंगी काय काय उपाययोजना करावी याबाबत संपूर्णरित्या उत्तम प्रकारची माहिती विद्यार्थी, शिक्षक व पालकांना समजावून सांगितली.
अग्निशामक पथकाचे अधिकारी विजय राठोड यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांना शाळेतून मिळालेला प्रतिसाद व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी कार्यक्रमाला लावलेली हजेरी व केलेल्या निरीक्षणाची दखल घेऊन आनंद व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक साजिद पाशा यांनी अग्निशामक पथकाच्या सर्व कर्मचारी, अधिकार्यांचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केले. बुऱ्हान पठाण यांनी आभार मानले. खान मदिहा, आफरीन शेख, शेख फौजिया, आशा ढोकणे, शेख झीनत, धनश्री खिल्लारे, खान सुमैया, निलोफर शेख, दीपाली दळे, शेख सुमैय्या, पुजा जाधव, खान रिदा, शेख निदा, आरीफ शेख, नफिसा खाला, सलमा खाला आदींनी परिश्रम घेतले.